परभणी(Parbhani) :- कापड दुकानातील कपडे ग्राहकांना कमी पैशात देणे आणि ते पैसे स्वत:कडे ठेवून घरी घेवून जात जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत कापड दुकानातील महिला कर्मचार्याने अंदाजे दोन ते तीन लाख रुपयांची चोरी केली. या प्रकरणी १२ ऑगस्ट रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.
कमी किंमतीत कापड विक्री करत स्वत:कडे ठेवले पैसे
अनिसा खातून खान यांनी तक्रार (complaint) दिली आहे. फिर्यादीचे बालाजी मंदिर समोर कटपीस सेंटर कपड्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानावर शहेनाज बेगम ही महिला कामावर आहे. सदर महिलेने विश्वास संपादन केल्यानंतर दुकानातील कपडे ग्राहकांना किंमतीपेक्षा कमी रक्कमेत विक्री केले. सदरची रक्कम दुकान मालकाला न देता स्वत: घरी घेऊन गेली. व्यवसाय तोट्यात आल्यानंतर चोरीचे प्रकरण पुढे आहे. या बाबत फिर्यादीने विचारणा केल्यावर संबंधित महिलेने मला पैशांची गरज आहे, मी गरीब असून कामावर राहू द्या, अशी विनंती केली. त्यानंतर पुन्हा सदर महिलेने दुसर्या एका व्यक्तीसोबत मिळून दुकानातील कपडे कमी किंमतीत विकत रक्कमेचा अपहार केला. अखेर या प्रकरणी शहेनाज इरफान, वाजेद या दोघांवर नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपसा करत आहेत.