गोंदिया (Gondia) :- गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगाव/बांध येथे पाणीपुरवठा (Water supply) योजनेद्वारे झालेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात अतिसाराची लागण झाली आहे. त्यामुळे मागील दोन ते तीन दिवसापासून ग्रामीण रुग्णालयात (Hospitals)तसेच खाजगी दवाखान्यामध्ये रुग्णांची गर्दी वाढतच आहे.
तर आज 12 रुग्ण रुग्णालयात भरती झाले आहेत तर संभाव्य धोका लक्षात घेता 1 रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे रेफर करण्यात आले आहे.तर नागरिकांनी पिण्याचा पाणी उकळुन प्यावे आणि काळजी घ्यावी असे डॉक्टरांनी सांगितले आहे.