मानोरा (Manora):- तालुक्यातील आसोला खुर्द शिवारात दि. ३१ मे रोजी पहाटेच्या सुमारास जंगली हिस्त्र प्राणी (Wild animals)बिबट्याने गाय व वासरू यांची शिकार करून ठार केले. मृत(Dead)जनावरांचा पंचनामा वन विभागाकडून करण्यात आले असुन पशुपालक यांनी शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी पशुपालक श्रावण रतन जाधव यांनी केली आहे.
सविस्तर असे की, आसोला खुर्द शिवारात असलेल्या १५७ गट नंबरच्या शेतातील (Farm)गोठ्यात जनावरे बांधलेली होती. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने गाय व वासरु यांच्या मानेवर व पोटावर पंजाने वार करून ठार केले. सदर घटना सकाळी माहिती होताच वन विभाग कार्यालय(Forest Department Office) यांच्याकडे निवेदन देत पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असता वन रक्षक यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.