औंढा नागनाथ(Hingoli):- जिल्हा हिंगोली औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा (महादेव) चौकोण्या शिवारात शनिवारी (ता. 20) सायंकाळी एका शेतात वन प्राणीचा (Wild Animal)वावर आढळून आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाचे(Forest Department) पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. त्यासाठी आढळून आलेल्या पायांच्या ठश्यावरून तो बिबट्याच(Leopard) आहे का, याची खात्री केली जात आहे.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
औंढा तालुक्यातील अंजनवाडा ( महादेव )येथील शेतकरी विठ्ठल रामजी इंगळे व त्यांच्या पत्नी यशोदा विठ्ठल इंगळे यांनी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शेतातील राहत्या आखाड्याच्या बाजुने डोंगरद-यात जात असताना अचानक बिबट्या (Leopard) सारखा दिसल्याचा भास झाला. त्यामुळे दोघेही घाबरून पळून शेतातील आखाड्यावरुन अंजनवाडा गावात आले. त्यानंतर त्यांनी या प्रकाराची माहिती सरपंच किरण घोंगडे यांना सांगितली. बिबट्या आल्याची माहिती गावात पसरताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान,किरण घोंगडे यांनी तातडीने वन विभागालाही याची माहिती दिली. सकाळी रविवारी २१ जुलै सकाळी सात वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी कुंडलीक होरे, वनपाल संदीप वाघ ,वनरक्षक किशोर आयनि ले ,सरपंच किरण घोंगडे यांच्यासह वनविभाग कर्मचारी यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून माहिती घेतली.
घटना स्थळाजवळ व काही अंतरावर प्राण्याच्या पायाचे ठसे (Foot Print)आढळून आले. या ठश्यांचे छायाचित्र घेण्यात आले असून त्यावरून तो वन प्राणी हिंस्त्र प्राणी तडस असू शकतो असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वन विभागाने यांची त्वरित परताळणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकरी (Farmer)वर्गातून होत आहे