पुसद (Yawatmal) :- गेल्या अनेक दिवसांपासून शहरांमध्ये मुख्य रस्त्यांवर शाळा कॉलेज कोचिंग क्लासेस परिसरात शिवाय बाजारपेठेमध्ये टवाळखोर उनाड मुले बुलेट ला व इतर गाड्यांना सुद्धा कंपनीचे सायलेन्सर (Silencer) काढून कर्णकर्कश व वेगवेगळे आवाज काढणारा फटाका सायलेन्सर बसून घरामध्ये गाड्या फिरवीत होते.
पुसद उपजिल्हा वाहतूक शाखेची कारवाई
या फटका सायलेन्सर चा आवाज इतका मोठा आहे की गाडी जवळून गेल्यानंतर नागरिक दचकून जात असत. तर ही टवाळकर उनाड मुले विशेष करून महिला (Womens)मुली दिसल्या की, जोराने आवाज करीत गाड्या पडवीत असत. गेल्या काही दिवसांपासून, उपजिल्हा वाहतूक शाखा पुसदचे नव्याने आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात शहरात कारवाईचा (action) धडाका सुरू केला आहे. दि. 2 ऑक्टोंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक कर्णकर्कश आवाज करणारे फटाका सायलेन्सर हे गाड्यांचे जप्त केलेले. उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन ब्रिजे (IPS)यांच्या उपस्थितीत जवळपास 100 च्या वर फटाका सायलेन्सर वर बुलडोझर फिरविण्यात आला. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने शहरात फटाका बुलेट घेऊन फिरणाऱ्या व कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनधारकांमध्ये धडकी भरली आहे. पोलीस आपल्या कारवाईमध्ये सातत्य ठेवणार असून कंपनीचे सायलेन्सर काढून असे लोकांना त्रास देणारे फटाका सायलेन्सर लावणाऱ्यांवर पोलीस यापुढेही कारवाई करीतच राहील असे” दैनिक देशोन्नतीशी” (Deshonnati)बोलताना वाहतूक शाखेचे निरीक्षक निलेश शेंबडे म्हणाले हे विशेष.