परभणी/गंगाखेड (Parbhani):- येथील बसस्थानकासमोर असलेल्या एका लॉजवर (lodge) अल्पवयीन मुलीवर अत्याचार(torture) झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतांना लॉज मॅनेजरची चौकशी केली असता त्याने पोलीसांना उडवा उडवीची उत्तरे दिली. लॉज व्यवस्थापकाचे कृत्य आरोपीला सहकार्य व सहाय्य करणार असल्याने या प्रकरणात लॉजच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने संबंधितास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संबंधितास एक दिवसाची पोलीस कोठडी
लॉजवर अत्याचाराची घटना झाल्यानंतर या प्रकरणात लॉज मालकावर कारवाई करावी, याबाबत दैनिक देशोन्नतीने (Deshonnati)वृत्त प्रकाशित केले होते. या प्रकरणात आरोपीने पिडीत मुलीला लॉजवर घेऊन गेला असता लॉज व्यवस्थापकाने संबंधितांकडे ओळखीबाबतचे कोणतेही पुरावे मागीतले नाही. लॉजवरील रेकॉर्ड ठेवले नाही. घटनेनंतर तात्काळ पोलीसांना कळविणे बंधनकारक व आवश्यक असतांना तसे न करता गुन्हयातील आरोपीस सहाय्य केले.
ओळखपत्राची खात्री करावी
लॉजमध्ये येणारे प्रवाशी, ग्राहक, महिला यांच्याबाबत ओळखपत्राची खात्री करावी, एक प्रत लॉज प्रशासनाकडे ठेवावी. अल्पवयीन मुले, मुलीं यांना लॉजमध्ये प्रवेश देऊ नये, लॉजमध्ये ग्राहकांची संपूर्ण माहिती रजिस्टरमध्ये भरून घ्यावी, संशयास्पद व्यक्ती, इसमाबाबत तात्काळ पोलीसांना कळवावे, असे आवाहन गंगाखेड पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.