कारंजा (Karanja):- कारंजा शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीला (Minor school girl) घरातून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार (sexual abuse)करण्यात आला. याप्रकरणी २४ वर्षीय युवकाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारंजा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन शाळकरी मुलगी स्थानिक महात्मा फुले नगर येथील रहिवासी आहे. आरोपीने तिला २४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास तिच्याच घरातून फुसलावून पळवून नेले व स्थानिक बायपासवरील एका मित्राच्या घरी नेऊन रात्रभर तिच्यावर जबरी लैंगिक अत्याचार केला व दुसऱ्या दिवशी पीडितेला तिच्या ३६ वर्षीय आईजवळ आणून सोडले.
दरम्यान, याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, वैद्यकीय तपासणीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आरोपी अजय उर्फ विशाल इंगोले (२४, रा.महात्मा फुले नगर) याच्याविरुद्ध कलम ३६३,३७६ (२), (एन), ३७६ (अ), ४,५,६ पोक्सो कायद्यानुसार (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रियंका वासनिक करीत आहे.
——