पातूर (Akola):- शहरातील बाळापूर मार्गावर असलेल्या सिदाजी मंगल कार्यालय येथे क्षुल्लक कारणावरून एका अल्पवयीन मुलाने केलेल्या चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी (seriously injured) झाला. ही घटना १२ जूनच्या रात्री घडली असून, यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एक जण गंभीर जखमी; आरोपीला घेतले ताब्यात
सिदाजी मंगल कार्यालय येथे आयोजित एका लग्न समारंभात(wedding ceremony) महिलांचे नाचगाणे सुरु होते. यावेळी हल्लेखोर मुलगा हा महिलांना पाहत असताना त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अभिषेक प्रेमदास राठोड याने तू महिलांना का पाहत आहे, असा जाब विचारला असता तू बाहेर चल, तुला दाखवतो, असे म्हणून ओढत बाहेर नेले आणि चाकूने(Knife) अभिषेक याच्या पोटात, पायावर, खांद्यावर चाकूने हल्ला केला. यात अभिषेख हा गंभीर जखमी झाला आहे. फिर्यादी प्रेमदास रोशन राठोड यांच्या तक्रारीवरून पातूर पोलीस स्टेशन(Police Station) येथे अप नंबर ३२६/२४ कलम ३०७ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर अल्पवयीन युवकास ताब्यात घेण्यात आले असून, ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.