नाशिक(Nashik):- जिल्ह्यातील दिंडोरी मतदार संघात केंद्रीय मंत्री (Union Minister) डॉ. भारती पवार यांचा पराभव करून पेशाने शिक्षक असलेल्या भास्कर भगरे यांनी इतिहास घडविला. पण नाव व निशाणी सारखी असलेल्या एका ‘निरक्षर’ अपक्ष उमेदवाराने लाखाहून अधिक मते घेतल्याने पराभव होता होता खा. भगरे वाचले. निवडणूक आयोगाकडून याबाबत सुधारणा होत नाही. हे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे का? याबाबत मात्र जनतेत चर्चा सुरू आहे.
भाजपने कमी मार्जिनने जिंकलेल्या जागा भरपूर आहे
भाजपने कमी मार्जिनने जिंकलेल्या जागा भरपूर आहे. दोन हजारपेक्षा कमी मार्जिनने या जागा जिंकल्या आहेत. भाजपने (BJP) संपूर्ण भारतात अगदी काहीही उलटसुलट गोळाबेरीज केली तरी किमान ५० जागा अश्याच मिळवलेल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणेवर काय दबाव होता, हे महाराष्ट्रात बीड किंवा मुंबईत (Mumbai)लोकांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. बीडमध्ये तर बजरंग बाप्पा सोनावणे या उमेदवाराने तर निवडणूक अधिकाऱ्यांना आत्मदहनाची धमकी दिल्यानंतर प्रशासन थोडेफार हलले अन्यथा त्यांचा पराभव जाहीर करण्याचेच फक्त बाकी राहिले होते. तरी देखील मुंबईत रवींद्र वायकर यांना अशाच पद्धतीने विजयी घोषित करण्यात आले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट होत असते, पण त्यात कालापव्यय मोठ्या प्रमाणावर होतो व निवडून आलेल्या सच्चा उमेदवाराला मात्र मनस्ताप (heartache)सहन करावा लागतो. कुठं चुकलं आणि काय चुकलं याचा शोध घेतला तर दुसऱ्यांदा चुका आणि परिणाम टाळता येतात, हे आयोगाने ध्यानात घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात (Maharashtra)सातारला शशिकांत शिंदेच्या पराभवाला ‘पिपाणी’ चिन्हाचा खेळ जबाबदार आहे. जर आयोग निष्पक्षपातीपणे वागला असता तर चारशे पारच्या पिपाण्या केव्हाच पिचल्या असत्या. जर रडीचा डाव न खेळता ५६ इंच छातीने शुरासारखे लढले असते, तर भाजप दीडशे आणि एनडीएचा कार्यक्रम दोनशेमध्ये आटोपला असता.
‘तुतारी वाजविणारा माणूस’ व फक्त ‘तुतारी’ या दोन चिन्हांनी मोठ्या प्रमाणावर घोळ
‘तुतारी वाजविणारा माणूस’ व फक्त ‘तुतारी’ या दोन चिन्हांनी मोठ्या प्रमाणावर घोळ घातला. त्याचा फटका साताऱ्यातील उमेदवाराला बसला तर दिंडोरीतील उमेदवार हारता हारता वाचला. विशेष म्हणजे दिंडोरीतील शरद पवारांचा उमेदवार खरोखरच ‘सर’ आहे. तथापि, त्यांच्या विरोधातील उमेदवार तिसरी पास असतानाही त्याच्या नावापुढे ‘सर’ शब्द लावला. जो खरा ‘सर’ आहे त्याच्या नावापुढे ‘सर’ शब्द नसल्याने दुसरेच ‘सर’ खरे उमेदवार आहे, असे समजून लोकांनी मतदान (voting) केले व त्यांनी लाखाहून अधिक मते घेतली. आता हा खेळ सोपा वाटू लागल्यामुळे अनेक उमेदवार नामसदृश्य असलेल्या उमेदवारांना निवडणुकीत(election) उभे करून वेगळ्या मार्गाने राजकारण करू पाहत आहे. नाशिकमध्ये शिक्षक मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेने संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेने(Shiv Sena) विद्यमान आमदार किशोर प्रभाकर दराडे यांना उमेदवारी दिली. परंतु त्याच नावाच्या एका अपक्ष उमेदवाराने अर्ज भरल्याने त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला.
याशिवाय संदीप गुळवे नावाचे तीन उमेदवार उभे राहिले. असे प्रकार विविध मतदार संघात होऊ लागल्याने निवडणूक आयोगाने त्यावर उपाययोजना करण्याऐवजी फक्त सत्तारूढ गटाला मदत करण्याची भूमिका सातत्याने घेतल्याने लोकशाहीचे अध:पतन होत आहे. समान चिन्ह व समान नावे यावर उपाययोजना झाल्या नाही, तर भविष्यात महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात एक वेगळाच संदेश जाऊ शकतो. याशिवाय बॅलेट पेपरवर काही उमेदवारांचे चिन्ह ठळक, तर काही उमेदवारांचे चिन्ह अस्पष्ट देण्यामागे निवडणूक आयोगाची नेमकी भूमिका तरी काय? हे एकदा स्पष्ट झाले पाहिजे.