व्यक्तीची झाडाला गळफास लावून आत्महत्या
नेरी (chimur) :- चिमुर तालुक्यातील नेरी येथुन जवळच असलेल्या रामपुर जंगलातील टेकडी ला लागून असलेल्या एका झाडाला तेंदुपत्ता तोडणार्या लोकांना दि.८ मे च्या सकाळला एक फाशी लागलेला मृतदेह (Deadbody) आढळला. त्यांनी लगचे पोलीसांना माहीती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
बोथली (वा.) येथील रहीवासी पुष्पराज पाटील हा आपल्या परीवारासहीत अनेक वर्षापासुन वडाळा इथे किरायाने राहत होता. दि.७ मे च्या दुपारी चिमूर तालुक्यातील रामपुर टेकडी जंगल परीसरात पुष्पराज वासुदेव पाटील (४२) यांनी झाडाला गळफास (hanging) लावून आत्महत्या (suicide) केली. ही घटना तेंदुपत्ता तोडणार्या लोकांना दि. ८ मे च्या सकाळला एक फाशी लागलेला मृतदेह दिसला. घटनेची माहिती लगेच चिमूर पोलीसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करतानी एपीआय दीप्ती मरकम, पोलीस पडाल व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. उपजिल्हा रूग्णालय चिमूर येथे शवविच्छेदन (Autopsy) करण्यासाठी मृतदेह नेण्यात आला. पुढील तपास ठाणेदार बाकल यांच्या मार्गदर्शनात चिमूर पोलीस करीत आहे. आत्महत्या मागचे कारण काही समजु शकले नाही. पुढील तपास चालू आहे.