Wardha case :- सेलू तालुक्यातील वघाळा ते कोपरा रस्त्यावरून बाईकने आष्टा बेला येथील इसम लक्ष्मण वासुदेव भुते हा त्याच्या प्लॅटिना गाडी क्रमांक एम एच 31 बी बी 6555 या गाडीने सेवाग्राम वरून आपल्या बेला या गावाकरिता निघाला. सायंकाळी रात्री साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान वघाळा वरून निघाला असता कोपरा ते वघाळा रस्त्याच्या मधोमध आडवा दोर पकडून गाडीवरून व्यक्तीला खाली पाडले.
दोर आडवा पकडून तरुणाला पाडून बेदम मारहाण करून रुपये लुटून चोरटे पसार
यामध्ये त्याच्या छातीला व पायाला दुखापत झाली त्यानंतर त्याला बेदम मारहाण (Hitting) करून त्याच्या खिशा मधून दोन हजार रुपयाची रक्कम लुटून चार चोरटे तेथून पसार झाले. या घटनेने व्यक्ती भयभीत झाला असून त्यांने हमदापुर येथील पोलीस पाटील अतुल कांबळे यांच्याकडे आप बीती सांगितली. यात व्यक्तीच्या छातीला व पायाला जबर दुखापत झाली आहे. अशा प्रकारची घटना ही परिसरातील पहिलीच असून या घटनेची माहिती देताना व्यक्ती पूर्णपणे घाबरला आहे. रात्रीची वेळ असल्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले.