कळमनुरी (Save Girl life) : येथील डॉक्टर शंकरराव सातव महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या सतर्कतेमुळे कळमनुरी शहरातील दोन वर्ष वयाच्या मुलीचे प्राण वाचले. कळमनुरी शहरातील गोविंद सारडा हे आपल्या सुनबाई सौ. सेजल यांना घेऊन डॉ. शंकरराव सातव महाविद्यालयात प्रवेशा करिता गेल्या असताना त्यांच्या सोबत दोन वर्षाच्या कु. लावण्या या नातीला पण नेले होते.
प्रवेशाचा सोपस्कार करण्याकरता कार्यालयात बसले असताना नजर चुकवून दोन वर्षाची कु. लावण्या महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या हौदात जवळ पोंहोचली जमिनीच्या थोड्यावर असलेल्या या हौदात पडली स्टाफ रूम मध्ये बसलेल्या प्रा. दत्तराव खोकले व शिवाजी वायभासे यांनी हौदात काहीं पडल्याचे लक्षात आल्या आल्या खोकले यांनी तातडीने धाव घेऊन हौदात उडी मारली तर त्यांना (Save Girl life) चिमुकली गटांगळ्या खात असलेली दिसली त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिच्या केसाला धरून वर काढले व तात्काळ पायाला धरून पोटातील पाणी काढले.
एका मिनिटाचा जरी उशीर झाला असता तरी चिमुकली जीवाला मुकली असती त्यांच्या तत्परतेमुळे कु. लावण्याचा जीव वाचला कृतज्ञता म्हणून सारडा कुटूंबाच्या वतीने घरी बोलावून आभार व्यक्त केले याप्रसंगी माहेश्वरी समाजाचे ज्येष्ठ नागरिक बद्रीनारायण सोमाणी, सुरेशचंद्र सोमाणी, नंदकिशोर तोष्णीवाल, प्राध्यापक पैठणकर, बालाप्रसाद दरक यांचे सह सारडा परिवारातील सौ. बसंताबाई , गोविंद , सौ. नीलू , कान्हा, सौ. सेजल उपस्थित होते.
