परभणी (Parbhani) :- राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Farmers Association) वतीने छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)पुतळा परिसरात कृषि मंत्र्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जोडेमारो आंदोलन
कृषि मंत्र्यांनी भिकारी सुध्दा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात शेतकर्यांना पिकविमा योजना दिली. असे वक्तव्य केले. शेतकर्यांची तुलना भिकार्यांबरोबर करणार्या कृषि मंत्र्यांचा निषेध नोंदविण्यात आला. कृषि मंत्री कोकाटे यांच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. बेताल वक्तव्य करणार्या मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला. आंदोलनावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुंजा लोडे, राजपाल देशमुख, सचिन दुगाने, माऊली दुधाटे, व्यंकटी पवार आदींची उपस्थिती होती.