हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
हिंगोली (Hingoli Police case) : हिंगोली तालुक्यात बोअर मशीनवर काम करणाऱ्या तामीळनाडू राज्यातील कामगाराने वेतनाचे पैसे समजून २ लाख रुपये पळविल्याची घटना घडली असून, याप्रकरणी (Hingoli Police case) हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी २० फेब्रुवारीला रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Hingoli Police case) हिंगोली तालुक्यासह जिल्हाभरात शेतात तसेच घरासमोर बोअर पाडण्यासाठी तामीळनाडू व आंध्रप्रदेशातील कामगार कामाला आणण्यात आले आहे. बोअरवेलच्या ट्रकवर हे कामगार काम करतात. त्यासाठी त्यांना वेतनही दिले जाते. दिवसभर काम करून कामगार ट्रकसह पेट्रोलपंपा जवळ थांबून आराम करतात.
दरम्यान, तस्लीम सलीम रा.विजयवाडा, आंंध्रप्रदेश यांच्यासोबत तामीळनाडू राज्यातील कोविलपट्टी येथील व्हि. मुथ्थुपांडी हा कामगार म्हणून काम करतो. त्याला मागील काही महिन्यापासून वेतन मिळाले नाही. (Hingoli Police case) वेतनासाठी तो बोअरवेल ट्रक मालकाकडे सतत पाठपुरावा करीत होता. मात्र त्यानंतरही त्याला वेतन मिळाले नाही.
सदर ट्रक व कामगार कारवाडी शिवारातील एका पेट्रोलपंपावर थांबले होते. बोअरवेलच्या ट्रकमध्ये इंधन भरण्यासाठी तसेच इतर कामगारांच्या वेतनासाठी सुमारे २ लाख रुपयांची रक्कम त्याच्या जवळ ठेवण्यात आली होती. मात्र गुरुवारी सकाळी तो मोटरसायकल घेऊन नाश्ता करून येतो असे सांगून तो निघाला. त्याने खटकाळी बायपास येथे नाश्ता करून मोटरसायकल त्याच ठिकाणी सोडली अन तेथून पैसे घेऊन पोबारा केला.
दरम्यान, नाश्ता करण्यासाठी गेलेला मुथ्थुपांडी एक तास होऊनही आला नसल्याने इतर कामगारांनी त्याचा शोध घेतला असता त्याचा शोध लागला नाही. मात्र दुचाकी वाहन सापडल्यामुळे तो पैसे घेऊन पळाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी तस्लीम सलीम यांनी दिलेल्या तक्रारीवरून (Hingoli Police case) हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मुथ्थुपांडी याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डोंगरे यांच्या मार्गदर्शना खाली जमादार बाळासाहेब खोडवे, आकाश पंडीतकर पुढील तपास करीत आहेत.