परभणी(Parbhani):- बहुप्रतिक्षीत असलेल्या दर्गा रोडच्या कामाने गती पकडली आहे. जांब नाका येथे असलेल्या कमानीजवळ रस्ता बंदचे फलक लावण्यात आले आहेत. या रस्त्यावरील वाहतूक (Transportation) पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहनधारकांची मोठी समस्या मार्गी लागणार आहे. दर्गा रोड बरोबर महाराणा प्रताप चौक ते अपना कॉर्नर, गुलशनाबाग, धार रोड, कौडगाव रोड आदी जवळपास १९ किमी लांबीच्या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. दर्गा रोडला काही दिवसांपासून नालीचे काम सुरू आहे. बुधवार १९ जून पासून रस्ता खोदकामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.
वाहतूक दुसर्या मार्गाने वळविली
शहरातील प्रमुख रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था(state of disarray) झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहने खिळखिळी होत आहेत. त्याच बरोबर विविध आरोग्याच्या समस्या उभ्या टाकल्या आहेत. त्यात आता पावसाळा (rainy season) सुरू झाल्याने अडचणीत अधिक भर पडली आहे. वर्दळीचा असलेला दर्गा रोड आणि नानलपेठ रस्त्यावरुन जाणे तारेवरची कसरतच ठरत आहे. भुमिपूजन होऊन जवळपासून तीन वर्षांनी रस्ता कामाला मुर्हूत लागला आहे. आता जलदगतीने रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे. ऐन पावसाळ्यात काम सुरू करण्यात आले आहे. बुधवार पासून खोदकाम सुरू करण्यात आले आहे. या रस्त्यांची कामे झाल्यावर सदर भागातील वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.