लाखांदूर-साकोली मार्गावर तावसाी फाट्यावरील घटना
सुदैवाने जीवितहानी टळली
दिघोरी/मोठी (Ambulance fire) : लाखांदूर-साकोली मार्गावर तावसी फाट्यावर लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाच्या डायल १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग लागली. या आगीत रुग्णवाहिकेची राखरांगोळी झाली. या (Ambulance fire) आगीत सुदैवाने जीवितहानी टळली. सदर घटना दि.१२ जून रोजी रात्री ९ वाजतादरम्यान लाखांदूर तालुक्यातील तावसी फाट्यावर घडली.
लाखांदूर ग्रामीण रुग्णालयातील १०८ डायल रुग्णवाहिका क्रमांक एमएच १४ सीई ११३४ ही साकोली मार्गे भंडारा येथून रुग्ण नागपूरला पोहोचविण्यासाठी निघाली होती. भंडाराला पोहोचण्याआधीच तावसी फाट्यावर धावत्या रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला. त्यावेळी रुग्णवाहिका चालक अलिम शेख व डॉ. उत्तम ठाकरे रुग्णवाहिकेत होते. (Ambulance fire) आग लागल्याचे लक्षात येताच रुग्णवाहिका चालक याने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून दोघेही रुग्णवाहिकेबाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याची माहिती दिघोरी पोलिसांना देण्यात आली.
दिघोरीचे ठाणेदार प्रमोद शिंदे यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळी नगरपंचायत लाखांदूर येथून अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत (Ambulance fire) रुग्णवाहिकेची राखरांगोळी झाली होती. घटनास्थळी गावकर्यांनी तसेच मार्गावरुन ये-जा करणार्यांनी ‘बर्निंग अॅम्बुलन्स’चा थरार अनुभवला. या घटनेविषयी उपस्थित नागरिकांत उलट-सुलट चर्चांना पेव फुटले आहे.
१०८ डायल रुग्णवाहिकेला तालुक्यातच रुग्णांना सेवा देण्याचे तरतूद असतांना सदर रुग्णवाहिका ही भंडारा येथून रुग्ण नगापूरला पोहोचविण्यासाठी तालुक्याबाहेर कशी काय जात होती? कदाचित खाजगी कामानिमित्त रुग्णवाहिका (Ambulance fire) नागपूरला जात असावी, अशा चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये ऐकावयास मिळाले. यामुळे शंकेला पेव फुटले आहे. दिघोरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास ठाणेदार प्रमोद शिंदे यांचे मार्गदर्शनात दिघोरी पोलीस करीत आहेत. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


