ग्रामीण महिलेची इंग्रजी ऐकून सुशिक्षित व्यक्तीला देखील फुटेल घाम..!
ही महिला बारावीपर्यंतच शिकलेली असून, अस्खलित इंग्रजी बोलते
नवी दिल्ली (New Delhi) : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक गावातील महिला लोकांना इंग्रजी शिकवताना दिसत आहे. लोक त्या महिलेला ‘अडाणी शिक्षिका’ (Rustic Teacher) म्हणत आहेत. आजकाल सुशिक्षित (Educated) लोकांची ओळख त्यांच्या कपड्यांवरून आणि इंग्रजी बोलण्यावरून ठरते. लोकांना असे वाटते की, जे इंग्रजी बोलतात ते खूप हुशार असतात. पण या ‘अडाणी शिक्षिका’ असा विचार करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहेत.
या ‘अडाणी शिक्षिका’ आजकाल इंटरनेटवर (Internet) लोकांसाठी चर्चेचा विषय बनल्या आहेत. याचे कारण म्हणजे, या शिक्षिका अस्खलित इंग्रजी बोलतात आणि लोकांना इंग्रजी बोलायलाही शिकवतात. त्यांना पाहिल्यानंतर त्यांना इंग्रजी येते की नाही, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे ही महिला सोशल मीडियावर ‘देहाती मॅडम’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
‘देहाती मॅडम’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या महिलेचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामध्ये ती लोकांना इंग्रजी शिकवताना दिसते. अडाणी शिक्षिकेचे नाव यशोदा लोधी असून ती उत्तर प्रदेशातील सिरथू येथे राहते. यशोदा गृहिणी आहे. तिने फक्त बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. ती इंटरनेटवर लोकांना इंग्रजी शिकवते. आता या सगळ्यात सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं माहीत असूनही, ती आजही एका सामान्य खेड्यातील स्त्रीसारखीच दिसते. तिच्याकडे बघून ती शिकलेली आहे असे कोणीही म्हणू शकत नाही. पण त्याचे अस्खलित इंग्रजी (English) ऐकलं की लोकांची तारांबळ उडते. ही महिला आत्मविश्वासाने भरलेली आहे. नुसत्या चेहऱ्यावरून माणूस सुशिक्षित समजू नये, त्याचे ज्ञानही पाहिले पाहिजे, असे अनेकांचे म्हणणे आहे.