पुसद (Yawatmal):- पुसद शहरातील वाशिम रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या धनसळ पांदळ जुनी या रस्त्यावर अनधिकृत बांधकामांची मालिका सुरू झालेली असून याकडे मात्र नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत वायकोस व यांच्यासह बांधकाम विभागाचे (Construction Department) नगर अभियंता शाखा अभियंता यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
मुख्य अधिकारी व नगरपालिका बांधकाम विभागाचे दुर्लक्ष?
दिवसा ढवळ्या घरामध्ये अनधिकृत बांधकाम (Unauthorized construction) होत असताना शासकीय अधिकारी झोपा काढतात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. माहितीच्या अधिकारात एका कार्यकर्त्याने नगरपालिका प्रशासनाला या संदर्भात जाब विचारला आहे. मात्र त्याच्या माहितीच्या अधिकाऱ्याला केराची टोपली दाखवण्यात येत आहे. यामागे गौड बंगाल काय समस्त पुसदकरांना समजणे गरजेचे आहे. काही माहिती अधिकार कार्यकर्ते व काही माजी नगरपालिकेचे लोक प्रतिनिधी अनधिकृत बांधकामाला पाठबळ देताना दिसत आहेत. यासंदर्भात पुसद नगरपालिकेच्या समोर उद्या 13 डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू होणार आहे. त्याला तरी हे प्रशासन उत्तर देईल का. हे विशेष