भंडारा(Bhandara) :- भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन (Police Station) हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील शहापूर येथे महामार्गालगतच्या दोन दुकानांना दि.२५ जून २०२४ च्या मध्यरात्रीदरम्यान भीषण आग (terrible fire)लागली. या आगीत दोन्ही दुकानांची राखरांगोळी होऊन दुकानासमोरील दोन चारचाकी वाहने भस्म झाले.
गावकर्यांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात
शहापूर येथील नुतन हार्डवेअर व सौरभ इंटरप्रायझेस या दोन दुकानांना आग (fire) लागली. आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकानातील इलेक्ट्रानिक तथा हार्डवेअरचे (hardware) साहित्य जळून खाक झाले. तसेच दुकानासमोर ठेवलेल्या दोन चारचाकी वाहनांना आग लागून भस्म झाले. घटनास्थळी अग्नीशमन दल(fire brigade) दाखल होऊन गावकर्यांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. तोपर्यंत मात्र दोन्ही दुकानातील संपूर्ण साहित्यासह दोन्ही कारची राखरांगोळी झाली. यात दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारे दुकानमालक सुदैवाने बचावले. आगीत दुकानमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे(short circuit) आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास जवाहरनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी(Police Station Staff) करीत आहेत.