परभणी/ताडकळस(Parbhani):- येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या एका कापड दुकानाला मंगळवार ३ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास शाँर्ट सर्कीटने (Short circuit) आग लागल्याची घटना घडली.या घटनेत सदरील दुकानदाराचे अंदाजे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आगीच्या घटनेत सुमारे १० लाख रुपयांचे व्यापाऱ्याचे नुकसान
या बाबत अधिक माहिती अशी की, ताडकळस येथील ३३ केव्ही उपकेंद्रातुन गत काही दिवसांपासून कमी जास्त विजेचा प्रवाह होत आहे. यामुळे घरकुती टिव्ही, कुलर, पंखा, फ्रिज, लाईटचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मंगळवार ३ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास विजेच्या शाँर्ट सर्कीटने येथील मुख्य बाजारपेठेत महातपुरी येथील सुभाष दादाराव नंद यांचे अनन्या कलेक्शन आहे. या कनेक्शनला अचानक आग (Fire)लागली. या आगीत रेडीमेड व कपडा जळुन खाक झाला. ही आग विझवण्यासाठी आजुबाजुच्या शेजारच्या दुकानदारांनी प्रयत्न केले. तसेच घटनास्थळी पोलिसांनी देखील धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सदरील घटनेत या दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.