डोंगरशेळकी(Latur):- उदगीर तालुक्यात प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरशेळकी येथील तरुणाने दिग्दर्शित केलेल्या लघुपटांची अमेरिकेत होणाऱ्या फिल्म फेस्टिवलसाठी निवड झाली आहे. अमेरिकेत दक्षिण आशियाई आणि प्रवासाची सिनेमाप्रदर्शन करणारा 19 वा तसवीर चित्रमहोत्सव 2024 होत असून त्यासाठी ही अधिकृत निवड झाली आहे.
स्टोरी ऑफ युवराज आणि शहाजहान या प्रेमकथेची तस्वीर फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड
संतोष राम दिग्दर्शित ‘द स्टोरी ऑफ युवराज ॲण्ड शहाजहान’ (The Story of Yuvraj and Shah Jahan) हा लघुपट अमेरिकेच्या सिएटल येथे होणारा तस्वीर फिल्म महोत्सव ध्येय प्रदर्शित होणार असून 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे. दक्षिण आशियाई चित्रपटांसाठी ऑस्करची पात्रता असलेला जगातील लघुपट चित्रपट महोत्सव म्हणून तस्वीर ओळखला जातो. या महोत्सवात यंदा 110 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यात 15 देशांमधून बांग्लादेश,कॅनडा,फ्रान्स, श्रीलंका, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, जर्मनी, भारत, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स, नेपाळ, नायजेरिया, पाकिस्तान, पोर्तुगाल आणि स्वीडन देशांमधून चित्रपट समाविष्ट केले आहेत. चित्रपट(Movie)निर्माता, लेखक, दिग्दर्शक म्हणून मी नेहमीच वेगळ्या कथांकडे आकर्षित झालो आहे. ज्या समाजाच्या रूढींना आव्हान देतात आणि उपेक्षित समाजांना वाचा देतात. ही कहाणी खऱ्या घटनांवर आणि माझ्या सभोवताली घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे.
मराठी भाषेतील 25 मिनिटांचा हा लघुपट असून या लघुपटाचे (short film) चित्रीकरण लातुर जिल्हयातील उदगीर येथे झाले असुन यात स्थानिक कलाकारांचा समावेश आहे. राहुल बिरादार, विनय भगत, विवेक होळसांब्रे, अंजली जाधव, राजकुमार मुंडे, राम सुरनर, शेषराव फावडे या सर्व कलाकारांनी उत्तम कामे केली आहेत. संतोष राम हे नवनवीन कथा प्रभावी सादरीकरण आणि उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. त्यांच्या वर्तुळ, गल्ली आणि प्रश्न या फिल्म्स जगभरातील विविध महोत्सवात दाखवल्या गेल्या असून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.