Washim :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis)यांच्या संकल्पनेतून तयार झालेला ड्रीम प्रोजेक्टला (Dream Project) जिल्ह्यामध्ये चालना देण्याकरिता आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी पाणीटंचाई, पाणी समस्या, दुष्काळ यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जमिनीत पाण्याचा संचय करणे पाण्याचे पुनर्भरण करणे यासाठी वाशिम जिल्ह्यामध्ये जलतारा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
वाशिम जिल्ह्यामध्ये जलतारा प्रकल्प राबविण्याचा निर्णय
त्याचाच एक भाग म्हणून माननीय उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर मॅडम व रिसोडच्या माननीय तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाकद येथील मंडळ अधिकारी श्री ए व्ही लहाने व तलाठी श्री जी जी गरकळ व तलाठी श्री अक्षय जाधव यांनी मागील काही दिवसापासून सतत पाठपुरावा करून वाकद येथील शेतकऱ्यांना स्वखर्चातून स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन आपल्या शेतामध्ये जलतारा योजनाचा लाभ घेण्यासाठी प्रेरित केले त्याचाच एक भाग म्हणून आज वाकद येथील प्रगतशील शेतकरी श्री कुंदनसिंह प्रेमसिंह ठाकूर व भाजपाचे लखनसिंह प्रेमसिंह ठाकूर यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या वाकद येथिल शेतजमिनीमध्ये आज रोजी जलताराचे 22 खड्डे पूर्ण केले असून अजूनही उर्वरित जलतारा कांदा पिके निघाल्यानंतर घेण्याचे नियोजित आहे, आता वाकद शिवारातील अशा शासनाच्या मदतीविना केलेल्या जलतारांची संख्या 35 झाली आहे.
श्री कुंदनसिंह प्रेमसिंह ठाकूर व श्री लखनसिंह प्रेमसिंह ठाकूर दोन्ही बांधवांचा स्तुत्य उपक्रम
यावेळी सदर कामाची पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी ए व्ही लहाने, तलाठी जि जि गरकळ, तलाठी अक्षय जाधव यांचेसह नंदुभाऊ मगर, सुनील नारायण लाटे, विद्याधर दामोदर मोरे, हारगिर गिरी माजी सैनिक, शरद राजेंद्र मोरे बाळासाहेब देशमुख बंडू डहाके सुधीर मोरे खंडू माधव लाटे (महसूल सेवक) उपस्थित होते, मागील अनेक दिवसापासून माननीय जिल्हाधिकारी वाशिम, माननीय उपविभागीय अधिकारी वाशिम यांनी जलतारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्याना आपल्या शेतात एकूण एका एकरासाठी एक याप्रमाणे उताराच्या दिशेने शेतात ज्या ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणी पाच बाय पाच फूट लांबी रुंदी व सहा फूट खोली असलेले खड्डे खोदकाम करून त्यामध्ये मोठे मध्यम व छोट्या आकाराचे दगड भरून हे खड्डे भरून घ्यावे आणि त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे वाहणारे व गाळ वाहून नेणारे पाणी अशा ठिकाणी थोपून ते जमिनीमध्ये जिरवले जाईल यामधून “पाणी अडवा पाणी जिरवा” संकल्पना पूर्णत्वास जाईल
“जल है तो कल है”
“जल है तो कल है” असे आपण म्हणतो परंतु खरे म्हणजे अशाप्रकारे ग्रामपातळीवर प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत हात मिळवणी केल्याशिवाय शासनाचे हे काम पूर्णत्वास जाणार नाही. आपल्या राज्याचे सिंचनाचे शिल्पकार विकास पुरुष कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी सुरुवात केलेला स्तुत्य उपक्रम या योजनेमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे किंवा जे इतर जॉब कार्ड धारकामार्फत काम करून घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी जवळपास 5000 रुपयांपर्यंतचे अनुदान रोजगार हमी योजनेअंतर्गत देय आहे तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या गावातील व आपल्या परिसरातील मोठ्या शेतकऱ्यांनी (Farmers) हाच आदर्श घेऊन स्वयंस्फूर्तीने व स्वखर्चाने आपल्या शेतात जलतारांची निर्मिती करावी जेणेकरून भविष्यात सिंचनातून प्रगतीकडे प्रत्येक शेतकरी हा जायला पाहिजे व प्रत्येक शेतकऱ्याला जलतारा योजनेचा फायदा व्हायला पाहिजे त्याकरिता सर्वांनी आपल्या आपल्या शेतामध्ये ही योजना राबवावी असे आवाहन भाजपा उत्तर भारतीय महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव लखनसिंह ठाकुर यांनी केले