चिखली (Buldana):- ११ जून रोजी सायंकाळी तुफान वादळी वाऱ्यासह(Stormy winds) पावसाला सुरुवात झाली आणि अनेक घरांवरील टीनपत्रे उडाली परंतु त्यांमध्ये घरात झोक्यात झोपलेल्या ६ वर्षाच्या चिमुकली झोका लोखंडी अँगलसह(Iron Angle) हवेत उडाला. या घटनेत मुकलीचा आदळून जागीच दुर्दैवी मृत्यू (unfortunate death)झाला. ही घटना दे घुबे येथे घडली.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव घुबे येथे रात्री नऊ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (heavy rain)पडला .त्यामध्यें हवेचा जोर इतका भयानक होता की मोठ मोठी झाडें, घरवरचे टिन अचानक उडायला सुरवात झाली . त्यामुळे विज वितरण विभागाने विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे गावकरी जीव मुठीत धरून आपापल्या घरात बसले होते. त्यामध्ये गावातील भरत साखरे यांची सई नाव असलेली चिमुकली घरात लोखंडी अँगलला बांधलेल्या झोक्यात झोपली होती. घरातील इतर सदस्य जेवायला बसणार तेवढ्यात वाऱ्याने घरावरील टिनपत्रे लोखंडी अँगल आणि बांधलेल्या झोक्यासह हवेत उडाली. हवेत उडालेला झोका घरा पाडून दोनशे फूट अंतरावर जावून आदळला. त्यामध्ये झोक्यातील चिमुकली जमिनीवर आदळून तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलीस प्रशासन, तहसील विभागाला मिळताच तात्काळ घटनास्थळी मोठया संख्येने कर्मचारी व गावकरी उपस्थितीत होवून पंचनामा केला. गावकऱ्यांनी तातडीने चिमुकलीला दवाखान्यात (hospital)घेवून गेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत (Dead) घोषित केले. या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे.