कोरची (Godchiroli):- भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात (Accident) कोरची- मसेली राष्ट्रीय महामार्गावरील साल्हे गावाजवळ २ नोव्हेंबर ला दुपारी १२ वाजता दरम्यान घडले आहे.
कोरची मसेली राष्ट्रीय मार्गावर घटना..
कैलास सत्तर गावडे वय ३६ रा. चारभट्टी ता कुरखेडा असे गंभीर जखमीचे नाव आहे. जखमी एक डिसेंबर रोजी सायंकाळी लहान बहिणीच्या सातव्या महिन्याचा कार्यक्रमासाठी साल्हे या गावी आले होते. गावातीलच मोठ्या बहिणीच्या घराकडे जात असताना अपघात घडले. एम एच ४० झेड ९२५० दुचाकी क्रमांकने जखमी कैलास साल्हे गावातुन राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना कोरचीवरून भरधाव वेगाने गोंदियाला निघालेल्या एम एच ३४ ए एम ८२३७ क्रमांकाच्या कार चालक अभियंता रामकुमार झाडे रा. ब्रह्मपुरी यानी जोरदार धडक दिली. कारची ही धडक एवढी जोरदार होती की दुचाकी चालक दहा फूट दूर रस्त्याचा बाजूला जाऊन कोसळले या अपघातील जखमी कैलासचा डावे पाय मोडले असून डोक्याला मार लागला आहे.
घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली
घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली कारचालक अभियंतांनी जखमी (Injured) झालेल्या कैलास गावडे याला रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाला अडवून मदत मागून त्याच्या वाहनातुन कोरची ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत यांनी प्राथमिक उपचार करून गंभीर दुखापत असल्यामुळे नातेवाईकांना जखमीला गडचिरोली रुग्णालयात हलविण्यास सांगितले आहे. सदर अपघात ग्रस्त चार चाकी वाहन घटनास्थळीच असून कारचे खूप नुकसान झाले आहे तर अपघातातील दुचाकी गावकऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला करून ठेवली आहे. कारचालक हा अभियंता असून ब्रह्मपुरीचा रहिवासी आहे.