देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली (बुलडाणा/ Buldhana) :- संपूर्ण देशात सर्वोच्च सभागृहाच्या निवडीची अर्थात भारत देशाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.त्या अनुषंगाने मातृतीर्थ बुलडाणा लोकसभा (Buldana Lok Sabha) मतदार संघ अंतर्गत २३ चिखली विधानसभा(Assembly) मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व ती प्रक्रिया चोख सांभाळणाऱ्या सर्व यंत्रणेतील घटक यांच्या माध्यमातून एक आगळी वेगळी व समाजाचे लक्ष वेध होईल अश्या प्रकारची कृती घडवून आणल्या गेली आहे.
चिखली तहसीलदाराचे अनोखे निवडणूक पथक
या निवडणूक प्रक्रियेत मतदान घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या चमू मध्ये संपूर्ण महिला भगिनीं (female sisters)यांचा समावेश असून मतदान केंद्राध्यक्ष व इतर सर्व कर्मचारी ह्या महिला आहेत. आम्ही सुद्धा सक्षम आहोत, अबला नाही सबला आहोत, आणि देशाच्या या महान कार्यात आमचा सुद्धा सहभाग आहे व त्यात आम्ही अग्रभागी आहोत याचा सार्थ अभिमान ह्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावर दिसत होता. मंडळ अधिकारी मंगल सवडदकर, तलाठी कल्पना वानखेडे, अर्चना बाहेकर, इंदु शेजोळ, अर्चना शिंगणे, संगीता कासारे यांचा या चमुमध्ये समावेश आहे. अभिनव अशा या चमू चे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. या उपक्रमामुळे नक्कीच ही प्रकिया गतिमान होणार आहे.