अर्जुनी/मोरगाव(Gondia) :- अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बोदरा/देऊळगाव येथील कक्ष क्रमांक 307 राखीव जंगलात वन्यप्राणी (wild animals) पट्टेदार वाघाने गाय(cow) ठार केल्याची घटना दि.6 ऑगस्ट मंगलवार ला सायंकाळी 4:00 वाजताच्या दरम्यान घडली.
दडुन बसलेल्या पट्टेदार वाघाने केला गायीवर हल्ला
निमगाव येथील मनोहर झिंगाजी चचाने ठार झालेल्या गाय मालकाचे नाव आहे. सदर घटनेचा पंचनामा वन परिक्षेत्र अधिकारी (Forest Range Officer) सचिन कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक भोगे मैडम आणि वनरक्षक माधुरी लुचे यांनी केला आहे. सदर गाय चराई साठी बोदरा/देऊळगाव जंगलात गेली असल्याने दडुन बसलेल्या पट्टेदार वाघाने गायीवर हल्ला चढवुन गायीला ठार केले. यामुळे पशुधन मालक मनोहर चचाने यांची 40 हजार रुपयाचे नुकसान झाली असल्याने वनविभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तर सदर कक्ष क्रमांक 307 राखीव जंगलात वन्यप्राणी पट्टेदार वाघ वास्तव्यास असल्याने जंगलामध्ये नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांनी केले आहे.