परभणी/सेलू (Parbhani):- भाऊजीच्या प्लॉटवर अँगल रोवत अतिक्रमण करणार्यांना तुम्ही प्लॉटमध्ये अँगल का लावत आहात?, अशी विचारणा केल्यावर तलवारीने(sword) डोक्यात मारुन एकाला गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना ६ जुलै रोजी रात्री साडे आठच्या सुमारास वालूर येथे घडली. या प्रकरणी ८ जुलै रोजी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी
शेख रज्जाक यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे पेट्रोल(petrol) टाकण्यासाठी पेट्रोलपंपावर आले होते. यावेळी त्यांना काही जण त्यांच्या भाऊजीच्या प्लॉटवर अँगल रोवत अतिक्रमण करताना दिसले. फिर्यादीने त्यांना या बाबत विचारणा करुन अँगल काढण्याचा प्रयत्न केला असता शेख रज्जाक यांना तलवार, काठीने मारहाण करत जखमी करण्यात आले. शिवीगाळ(Abusing) करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी अलताफ कुरेशी, अस्लम कुरेशी, अर्शद कुरेशी, अहेमद कुरेशी यांच्यावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेलू पोलीस अधिक तपास करत आहेत.