गंगाखेड (Girl sexual assault Case) : इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणार्या दहा वर्षीय मुलीवर गंगाखेड शहरातील एका वकिलाने वारंवार अत्याचार केला. या प्रकरणी पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पुणे येथील भोसरी पोलिस ठाण्यात वकिलासह पिडीतेच्या आजीविरुध्द झिरोने गुन्हा नोंद झाला आहे. सदर गुन्हा गंगाखेड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
या (Girl sexual assault Case) घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पिडीतेचे आई – वडील पुण्यात राहत असल्याने पिडीता ही गंगाखेड येथे शिक्षणासाठी आजीकडे राहत होती. या दहा वर्षीय मुलीवर आजीकडे येणार्या राम गायकवाड नामक इसमाने ऑगस्ट २०२३ ते २४ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान अत्याचार केला. हा प्रकार घडताना पिडीतेच्या आजीने आरोपीला सहाय्य केले.
घडला प्रकार कोणाला सांगितला तर शेतात पुरुन टाकेल अशी धमकी पिडीतेला दिली. पिडीत मुलगी दिवाळीच्या सुट्टीत आई, वडीलांकडे पुणे येथे गेल्यावर तिने घडला प्रकार आईला सांगितला. यावरुन भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्हा गंगाखेड पोलिसांना वर्ग करण्यात आला. (Girl sexual assault Case) घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पो.नि. दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या पथकाने राम गायकवाड याच्यासह पिडीतेच्या आजीला ताब्यात घेतले. तपास सपोनि. राम गीते करत आहेत.