Dindigul Fire Accident:- दिंडीगुल येथील त्रिची रोडवरील एका खासगी रुग्णालयाला (Private hospitals) गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत किमान सात जणांचा मृत्यू (Death)झाला असून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे.
पोलिसांनी सांगितले की, सिटी हॉस्पिटल, ऑर्थोपेडिक केअर हॉस्पिटलच्या रिसेप्शन परिसरात रात्री 9 च्या सुमारास आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण इमारतीला आग लागली. आग आणि धूर चारही मजल्यांवर पसरल्याने एका मुलासह सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला.
एका मुलासह सात जणांचा गुदमरून मृत्यू
लिफ्टमध्ये अडकल्यानंतर सहा जणांची सुटका करण्यात आली. त्यांना गुदमरल्यासारखे झाले आहे आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत,” असे दिंडीगुलचे जिल्हाधिकारी एम एन पूंगोडी यांनी सांगितले. कमीतकमी 29 लोकांना, बहुतेक ऑर्थोपेडिक रूग्णांना जवळच्या सरकारी रुग्णालयात (Government hospital) हलवण्यात आले. सुरुली (50), त्यांची पत्नी, थेनी जिल्ह्यातील 45 वर्षीय सुब्बुलक्ष्मी, 50 वर्षीय मरियममल, तिचा मुलगा, 28 वर्षीय मणी मुरुगन, दिंडीगुल जिल्ह्यातील 35 वर्षीय राजसेकर आणि एका मुलीचा मृत्यू झाला.