जिंतूर (Parbhani):- जिंतूर – सेलू विधानसभा मतदारसंघात ४१ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. मात्र सोमवार ४ नोव्हेंबर रोजी २४ उमेदवारांनी माघार घेतल्याने १७ उमेदवार मैदानात उतरले आहेत. खरी लढत भाजपाच्या (BJP)विद्यमान आ. मेघनाताई बोर्डीकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आ. विजय भांबळे आणि वंचित बहूजन आघाडीचे सुरेश नागरे यांच्या तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहे.
तिरंगी लढत होण्याची चिन्हे
जिंतूर विधानसभा मतदार संघात येत्या २० नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत नवख्या उमेदवारांसह मातब्बर नेत्यांनी निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेतली आहे. सुरुवातीपासूनच हा मतदार संघ चर्चेत होता. निवडणुकीसाठी सुमारे ४१ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले. पण नामनिर्देशन पत्र माघार घेण्याच्या दिवशी तब्बल २४ उमेदवारांनी (candidates) रणसंग्रामातून माघार घेतल्याने आता १७ उमेदवार मैदानात उरले आहेत. विद्यमान आ. मेघना बोर्डीकर, माजी आ. विजय भांबळे आणि सुरेश नागरे या तीन उमेदवारांमध्ये खरी तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहे.
४१ पैकी २४ उमेदवारांची माघार
परंतु उर्वरित पक्षांचे उमेदवार ही मतदानाच्या(Voting) समीकरणात परिणाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीच्या मैदानाचे चित्र स्पष्ट झाल्याने प्रचारात आता खरी रंगत चढणार असल्याची चिन्हे दिसत आहे. मात्र मागील निवडणुकीपेक्षा मतदारसंघात सामाजिक आणि राजकिय परिस्थितीत थोडेफार बदल झाल्याने जो उमेदवार प्रचारात चाणक्य बुद्धीचा वापर करून अजोड रणनीती आखाणार तोच उमेदवार विजयाचा शिलेदार ठरणार हे ही तितकेच खरे.