मानोरा (Washim) :- आसोला खुर्द तालुक्यातील आसोला देवठाना रस्त्यावर शुक्रवार ९, ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता बिबट्या दिसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वन विभागाकडुन सर्च ऑपेरेशन, वाघ नसल्याचा दुजोरा
वनविभागाशी संपर्क केला असता हा कोण्यातरी व्यक्तीने खोडसळपणा केला आहे. वनविभागाकडुन(Forest Department) असोला देवठाणा परीसरात सर्च आॉपरेन करण्यात आले. वाघाचा वावर आसणार्या खुना कीवा वाघ असल्याचे संकेत दिसले नाही. आसोला ते देवठाना परिसरातिल शेताकरी वाघ दिसल्याच्या आफवेमुळे या रस्त्यावरील शेतात जाणारे शेतकरी भयभीत झाले होते. आसोला, कारपा देवठाना हा भाग डोंगर जंगलाने वाढलेला असून या भागात वन्यजीव विविधता मोठ्या प्रमाणात आढळून येते रानडुक्कर, हरीण, निलगाय कोल्हे लांडगे ससे आणि इतरही प्राण्याचा अधिवास या जंगलामध्ये आहे. वनविभागा मार्फत जंगल परीसराची पाहणी केली. असता वाघाचा सहवास असल्याच्या खुणा मिळाल्या नाही कोणीतरी आफवा पसरविली आहे, तरी शेतकऱ्यानी बाकी हिस्त्र प्राण्यापासुन सावध रहावे.