हिंगोली(Hingoli):- स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (Ministry of Works), भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान “स्वच्छता ही सेवा”(SHS) पंधरवाड्याचे आयोजन करून “स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता” हि संकल्पना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने नगरपालिके मार्फत शहरात विविध उपक्रम, लोकसहभाग, जनजागृती करणे बाबत आदेशित केले आहे.त्याअंतर्गत हिंगोली नगर परिषदेचे (City Council) प्रशासक तथा मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिके मार्फत स्वच्छता हि सेवा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये श्रमदान, स्वच्छता शपथ,एक पेड मा के नाम, विविध स्पर्धा, जनजागृती पर कार्यक्रम, सेल्फी पॉइंट, पथनाट्ये, स्वच्छता पाठशाला, ई. कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यानुसार २० सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा कोषागार कार्यालयाच्या रस्त्यावरील मध्यभागी असलेल्या डिव्हायडर मध्ये एक पेड मा के नाम उपक्रम राबविण्यात आला असून यामध्ये आईच्या नावाने एक झाड लावण्यात आले.
जिल्हा कोषागार अधिकारी श्री. झुंझारे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कोषागार अधिकारी श्री. झुंझारे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.तसेच यामध्ये जिल्हा कोषागार कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी,बांधकाम विभागाचे इंजि. धाडवे सर,हरदीपसिंग भाटीया,तसेच नगर पालिकाचे उपमुख्याधिकारी
शाम माळवटकर, लेखापाल अनिकेत नाईक, इंजि. वसंत पुतळे, राजेश पदमने, किशोर काकडे, प्रवीण मोहेकर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, आकाश देशमुख, संदीप घुगे, विनय शाहू, आशिष रणसिंगे, अशोक गवळी, पंडित मस्के, विजय रामेश्वरे, भागवत धायतडक, श्रीमती सनोबर तसनीम, कमलेश इंगळे, आकाश गायकवाड, अथर्व वर्मा, रवी जोंधळे, चेतन भूजवने आदी कर्मचारी उपस्थित राहून सदर वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला.