कारंजा(Washim):- चाकूचा धाक दाखवून एका ट्रक चालकास फिल्मीस्टाईल पद्धतीने लुटण्यात आल्याची घटना ७ जुलै रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास मंगरूळपीर रस्त्यावरील शेलुवाडा फाट्याजवळ घडली. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालकास चाकूचा धाक दाखवून केले जखमी
करंजा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा ट्रक (truck)चालक असून, तो त्याच्या ताब्यातील ट्रक घेवून जात असताना अज्ञात दोन आरोपींनी मोटारसायकल चालवत ती ट्रकच्या समोर आडवी लावली. तेव्हा चालकाने ट्रक थांबवला असता, आरोपींनी चालकास चाकूचा धाक दाखवून किरकोळ जखमी केले व त्यांच्या खिशातील ३,२०० रुपये रक्कम घेवून तेथून पोबारा केला. ट्रकचालक राजारामसिंग श्रीदेवनारायणसिंग (५१, रा. मुरली पोस्ट मोतीपुर जि. समस्तीपुर , बिहार) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०९,(६) (३) (५) बी.एन.एस. नुसार गुन्हा (crime) दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी धनराज पवार करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आशिष रतन गिरी उर्फ मुन्ना (२६, रा. मंगळसा ता.मंगरूळपीर) यास अटक(arrested) केली आहे.