अर्जुनी मोर(Gondia)- शहरातील प्रभाग पाच येथील अडीच वर्षाच्या चिमुकल्या चा विहीरीत पडुन दुर्देवी मृत्यु (Death)झाल्याची घटना आज ता.17 सप्टेंबर ला दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडली. मृत बालकाचे नाव रेयांस संदिप शहारे अर्जुनी मोर. असे आहे.
अंगणाजवळ असलेल्या विहीरीत पडुन त्याचा दुर्देवी मृत्यु
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृतक अडीच वर्षाचा रेयांस हा घरासमोर खेळत असताना अचानक आईची व घरच्यांची नजर चुकवून अंगणाजवळ असलेल्या विहीरीत पडुन त्याचा दुर्देवी मृत्यु झाला. रेयांस दिसत नाही म्हणुन घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. पण रेयांस कुठेच सापडला नाही. प्रभागातील काही लोकांनी विहीरीत डोकावुन पाहीले असता सदर बालक नजरेश पडला. लगेच त्याला बाहेर काडण्यात आले.व दवाखान्यात नेले असता तो पर्यंत बालकाचा मृत्यु झाला होता. संदिप शहारे मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असुन मृतक रेयांस हा एकुलता एक मुलगा होता. अचानक घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे शहारे कुटुंबावर दु:खाचा पहाड कोसळला असुन शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.