(Chandrapur): बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील(Forest area) कारवा बल्हारशाह जंगल सफारी मध्ये दिनांक १३ मे २०२४ ला बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी गस्त करीत असतांना सकाळी ९.३० वाजताचे सुमारास सफारी(Safari) मधील कक्ष क्रं. ५१० नियतक्षेत्र किन्ही येथे दोन वाघाच्या झुंजीत एक अडीच वर्षीय नर वाघाचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले.
दोन वाघाच्या झुंजीत एक अडीच वर्षीय नर वाघाचा मृत्यु
पुढील कार्यवाही करण्याकरीता मौका स्थळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (Conservator of Forests) यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर व राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण(National Tiger Authority) प्रतिनिधी बंडु धोत्रे यांना बोलावुन यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन वन्यप्राणी अधिनियम १९७२ अन्वये प्राथमीक वनगुन्हा क्रमांक ०८९६१/२२४०१३ दिनांक १३/०५/२०२४ जारी करुन मृत वाघाचे शव(Carcass of a tiger) ताब्यात घेण्यात आले व शव शवविच्छेदना(Autopsy) करीता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प(Tadoba Andhari Tiger Reserve), चंद्रपुर येथे नेण्यात आले.
पुढील तपासा करीता मृत वाघाचे सिलबंद नमुने घेण्यात आले
मृत बछडयाचे शवाचे शवविच्छेदन डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी, ऊऊण् चंद्रपुर व डॉ. आनंद नेवारे, पशुवैद्यकीय अधिकारी, चंद्रपुर यांनी केले. सदर प्रकरणात पुढील तपासा करीता मृत वाघाचे सिलबंद नमुने घेण्यात आले असुन ते रासायनीक विश्लेषणाकरीता वैज्ञानिक प्रयोगशाळा (Scientific laboratory) येथे पाठविण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, स्वेता बोड्डू व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत. सदर कार्यवाही पुर्ण करण्याकरीता क्षेत्र सहाय्यक व्हि.पी. रामटेके, बि.टी.पुरी, वनरक्षक वैशाली जेणेकर, माया पवार, रंजीत दुर्योधन, परमेश्वर आनकाडे, एस.एस. नैताम व मनोहर धाईत व रोजंदारी वनसंरक्षण मजुर यांनी सहकार्य केले.