हडोळती(Latur) :- अहमदपूर तालुक्यातील वंजरवाडी येथील दिपक वनलवाड यांच्या शेतात पिकांची नासधूस होऊ नये म्हणून लावलेला जाळीत अतिविषारी साप दिसून आला. जाळ्यात अडकलेल्या या विषारी सापाची सर्पमित्रांनी सुटका केली. दीपक वनलवाड यांनी ताबडतोब वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी (Wildlife Conservation Society) लातूर अंतर्गत काम करीत असलेले सर्पमित्र अमोल शिरूरकर, अशोक कांबळे, सूरज टोकलवाड यांना संपर्क साधला असता.
वंजारवाडी पिकांसाठी लावलेल्या जाळीत अडकला साप
शिरूरकर ग्रुपची टीम त्या ठिकाणी जाऊन त्या विषारी नाग (Cobra) या जातीच्या सापाला कसलीही इजा न होऊ देता सुखरूप जाळ्यातून बाहेर काढले. सर्पमित्र शिरूरकर ग्रुपमधील सर्पमित्र गोरख खेडकर, दयानंद हाक्के, गणेश कोल्हे, निखिल घटमाळ यांनी ही कामगिरी केली. अहमदपूर, चाकूर, जळकोट, परिसरात साप अथवा जखमी पशु प्राणी आढळून आल्यास न मारता, न घाबरता आमच्या सर्पमित्र शिरूरकर ग्रुपशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र /सर्पअभ्यासक अमोल शिरूरकर यांनी केले आहे.
अमोलचे अनमोल कार्य…
साप दिसला की, बर्याच जणांची बोलती बंद होते; परंतु, सर्व साप हे विषारी नसतात. साप दिसला की, त्याला मारण्याचा विचार झटकन डोक्यात येतो. पण सापाला न मारता एक फोन केला, की सर्पमित्र अमोल शिरूरकर हा काही वेळातच तेथे पोहचतो व सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडतो. आजपर्यंत सर्पमित्र अमोल शिरुरकर यांनी सापासह खवले मांजर, पिसाळलेले वानर, मगर यांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले. त्यामुळे या प्राण्यांना जीवदान मिळाले आहे.