परभणी(Parbhani):- राष्ट्रवादी काँग्रेसचे(Nationalist Congress) नवनिर्वाचित आ. राजेश विटेकर यांचे सोमवारी शहरात आगमन झाले. आ. विटेकर हे विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच शहरात आले. राष्ट्रवादीच्या आजीमाजी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत
सकाळी साडे आकरा वाजता आ.विटेकर यांचे परभणी शहरात आगमन झाल्यानंतर त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr. Babasaheb Ambedkar), छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj), महात्मा फुले (Mahatma fule)यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी माजी महापौर प्रताप देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण तळेकर, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे कृष्णा कटारे, अक्षय जगताप, संजय कदम, रामेश्वर आवरगंड, मुरली केसरे आदीनी आ.विटेकर यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर मिरवणूक वसमत रोड मार्गे काढण्यात आले.
वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यात आ. विटेकर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले
या मार्गावरील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यात आ. विटेकर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पुढे श्री शिवाजी कॉलेज समोरील राष्ट्रवादीच्या शाखाफलकाचे अनावरण आ. विटेकर यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर खानापूर फाटा येथे आ.विटेकर यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठिकठिकाणी व्यापारी, नागरीकांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. मिरवणूकीत राष्ट्रवादीचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.