चिखली (Buldhana) :- पोलीस स्टेशन (Police Station) साखरखेर्डा हद्दीतील शिंदी येथील अवैध दारु विकणारी महीलेला बुलडाणा तसेच लगतच्या जिल्हातुन सहा महिन्याकरिता मा. उपविभागीय दंडाधीकारी सिंदखेडराजा यांचे आदेशाने हद्दपार करण्यात आले आहे.
जिल्ह्यातून वाशिम जिल्हयातुन हददपार आदेश केला
साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार करेवाड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले की पोलीस स्टेशन हददीतील ग्राम शिंदी येथील अवैध दारु(Illegal liquor) विक्रेती महीला नामे श्रीमती लक्ष्मीबाई मारोती वाघमारे वय ५३ वर्ष रा. शिदी ता. सिंदखेडराजा जिल्हा बुलडाणा यांचे विरुध्द पोलीस स्टेशन साखरखेर्डा येथे अवैध दारु विक्री करणे, स्वःताचे कब्जात बाळगणे यावरून ४५ गुन्हे दाखल आहेत. सदर महीलेवर वारंवार प्रतीबंधक कारवाई करुन सुध्दा अवैध दारु विक्री करीत होती. त्यामुळे तिचे विरूध्द विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१), (ब) अन्वये दोन वर्षा करीता बुलडाणा तसेच लगतच्या जिल्हातुन वाशिम जिल्हयातुन हददपार करण्या करीता प्रस्ताव क्रमांक ०२/२०२३ मा. उपविभागीय दंडाधिकारी सिंदखेडराजा यांचे न्यायालयात मा. जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब बुलडाणा यांचे मार्फतीने प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावा वरुण उपविभागीय दंडाधिकारी प्रा. संजय खडसे सिंदखेडराजा यांनी महीला श्रीमती लक्ष्मीबाई मारोती वाघमारे रा. शिंदी ता. सिंदखेडराजा जिल्हा बुलडाणा यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१), (ब) अन्वये सहा महिन्याकरिता बुलडाणा तसेच लगतच्या जिल्ह्यातून वाशिम जिल्हयातुन हददपार आदेश केला आहे.
सदर आदेशाची बजावणी हददपार महीलेस दिनांक २३/०९/२०२४ रोजी करण्यात आली आहे. हददपार महीला श्रीमती लक्ष्मीबाई मारोती वाघमारे वय ५३ वर्ष रा.शिदी ता. सिंदखेडराजा जिल्हा बुलडाणा ही हददपार कालावधी मध्ये अकोला जिल्हा येथे राहणार आहे. सदरची कारवाई ही मा. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक महामुनी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील , वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक लांडे सा नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक गजानन करेवाड ठाणेदार पोलीस स्टेशन साखरखेर्डा, पो.हे.कों राजे जाधव, पोकों राजेश गीते, पोहेकॉ संजय भुजबळ, स्था.गु.शा बुलडाणा यांनी मदत केली आहे.