परभणी(Parbhani) :- तु मला का बोलत नाहीस, असे म्हणाल्यावर मी तुला कशाला बोलू, असे उत्तर दिल्यानंतर एका महिलेस क्रिकेटच्या बॅटने (Bat)मारुन जखमी करण्यात आले. ही घटना परभणी शहरातील जमजम कॉलनी भागात घडली. या प्रकरणी एकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिकेट बॅटने मारत केले जखमी
मताज शेख या महिलेने तक्रार दिली आहे. सदर महिला घरासमोरील अंगणात बसलेली असताना त्या ठिकाणी आलेल्या नुरोद्दिन काजी याने महिलेला तु मला बोलत का नाहीस, असे म्हणत शिवीगाळ (Abusing) करुन क्रिकेट बॅटने मारत जखमी केले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतरांनी भांडण सोडविले. जखमी महिलेने उपचार घेतल्यानंतर दिलेल्या तक्रारीवरुन कोतवाली पोलिसात गुन्ह्याची(Crime) नोंद करण्यात आली आहे. कोतवाली पोलीस अधिक तपास करत आहेत.
दुचाकी लंपास
परभणीतील पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथे घरासमोर उभी केलेली एकाची दुचाकी लंपास करण्यात आली आहे. या प्रकरणी अनोळखी चोरट्यावर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. महादेव इंगळे यांच्या ताब्यातील एम.एच. २२ ए.क्यु. ६१५८ या क्रमांकाची गाडी चोरीला गेली आहे.
गुटखा खाऊ घाल असे म्हणत मारहाण
गुटखा खाऊ घाल असे म्हणाल्यावर पैसे नाहीत असे म्हणाल्यानंतर एकाला शिवीगाळ करत हतातील कटरने मारुन जखमी करण्यात आले. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना परभणी तालुक्यातील पारवा येथे २५ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. मुंजाजी सोळंके यांच्या तक्रारीवरुन पांडूरंग जाधव याच्यावर परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.