हिंगोली (farmer suicide) : तालुक्यातील पेडगाव येथे वडिलांच्या नावे असलेल्या कर्जाला कंटाळून तरुण (farmer suicide) शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पेडगाव येथील शैलेश वाघजी बोडखे (२२) यास त्याच्या वडिलांच्या नावे पेडगाव शिवारात तीन एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. या शेतावर वाघजी बोडखे यांच्या नावे सुमारे ६० हजार रुपयांचे कर्ज असून इतर खाजगी कर्ज देखील आहे.
महादा बोडखे यांच्यावर असलेले बँकेचे व इतर खासगी लोकांचे कर्ज फेडता येत नसल्यामुळे त्यांचा मुलगा शैलेष बोडखे याने ३१ जुलैला पेडगाव शिवारातील शेतामध्ये टीन पत्राच्या घरातील लाकडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (farmer suicide) केल्याने १ ऑगस्टला वाघजी बोडखे यांच्या माहितीवरून बासंबा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.