Tumsar:- तुमसर-तिरोडी रेल्वे मार्गावर धावत्या रेल्वे गाडी खाली येऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना ८ जुन रोजी सकाळी समोर आली. दिपक भोंडेकर(२८) रा.हसारा टोली असे मृतक युवकाचे नाव आहे.
तुमसर-तिरोडी रेल्वे मार्गावरील हसारा टोली येथिल घटना.
घटनेच्या दिवशी दिपक हा कुणालाही न सांगता घरुन निघुन गेला व त्याने तुमसर-तिरोडी रेल्वे मार्गावरील धावत्या रेल्वे गाडी (Railway train)खाली येऊन आत्महत्या(suicide) केल्याची घटना घडली. सदर घटनेत दिपकचे धडा वेगळे पाय झाले आहे. वृत्तलिह़ोस्तर युवकांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. सदर घटनेची नोंद तुमसर रेल्वे पोलीसांनी घेतली असुन सदर घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.