परभणी(Parbhani):- सेलू बाईमाणसावर हात का उगारतोस असे म्हणाल्याने एका युवकाला जबर मारहाण (severe beating) करत जखमी करण्यात आले. ही घटना सेलू शहरातील विद्या नगर भागात २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली. या प्रकरणी २५ सप्टेंबरला सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी संगणमत करुन फिर्यादीच्या चुलत वहिणीला मारहाण
अखिल आतार यांनी तक्रार दिली आहे. आरोपी संगणमत करुन फिर्यादीच्या चुलत वहिणीला मारहाण करत होते. यावेळी फिर्यादीने त्यांना बाईमाणसावर हात का उगारतोस, असे विचारल्याने आरोपीला राग येऊन त्यांनी तलवारीने वार करत फिर्यादीला गंभीर जखमी(seriously injured) केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी अफजल कुरेशी, रिजवान कुरेशी, वाजीद खान यांच्यावर सेलू पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोह. जाधव करत आहेत.