शिरपूर जैन (वाशिम) :- शेततळ्यामध्ये पोहायला गेलेल्या निखिल किशोरराव देशमुख (वय १८) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू (death)झाला. ही घटना 21 मे रोजी घडली.पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची (sudden death) नोंद केली आहे.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली
प्राप्त माहितीनुसार शिरपूर येथील शंकर वाघ व श्याम वाघ यांचा भाचा निखिल हा सकाळीच आपल्या मित्रांसमवेत आयटीआय (ITI)कॉलेज अमानी येथे गेला होता. मात्र, कॉलेज मधून वेळेच्या आधीच सुट्टी झाल्याने साडेबारा ते १.३० च्या दरम्यान निखिल व त्याचे इतर पाच मित्र शिरपूर ते भेरा रोडवर असलेल्या एका शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, निखिल याचा पाण्यामध्ये डुबून दुर्दैवी मृत्यू झाला. निखिल हा लहानपणापासूनच त्याच्या मामाकडे शिक्षणासाठी राहत होता. परंतु २१ मे रोजी काळाने त्याच्यावर घाला घातल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या आई-वडिलांना निखिल हा एकुलता एक होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती. रात्री ९ वाजता त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. कृष्णा देशमुख यांच्या फिर्यादीवरून २२ मे रोजी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.