परभणी(Parbhani):- आज रोजी 11.00 वा. सुमारास पोस्ट सेलू हद्दीतील हादगाव पावडे या गावापासून पाचशे मीटर अंतरावर सातोना रोडवरील गहिनीनाथ पीर बाबा या देवस्थानाच्या जमिनीच्या बाजूस असलेल्या नाल्यातील बाभळीस गजानन सुदामराव बागल वय 33 वर्ष राहणार हादगाव पावडे या व्यक्तीने सुताच्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केलेली आहे.
सदर ठिकाणी आम्ही स्टाफ सह रवाना होऊन प्रत्यक्ष पाहणी केली सदरचे प्रेत पी.एम. कामी उपजिल्हा रुग्णालय (hospital)सेलू या ठिकाणी पाठवलेले आहे मृतकाचे नातेवाईक यांचे खबर घेऊन पुढील चौकशी करित आहोत. प्रथमदर्शनी मृतकाचा भाऊ परमेश्वर सुदाम बागल यांच्याकडे अधिक चौकशी करता मृतक यास पोटाचा आजार होता व तो त्या आजारामुळे(disease) त्रस्त झालेला होता त्यामुळे फाशी घेतली असावी असे सांगत आहेत.