अर्जुनी/मोरगाव (Gondia):- अर्जुनी/मोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोंडगाव/देवी पासुन 1 किमी अंतरावर असलेल्या रोपवाटीके जवळ चारचाकी वाहनाने युवकाला धडक (hit)दिल्याने युवकाचा जागीच मृत्यु(Death) झाला गाडी क्रमांक एमएच 35 एजी 1667 असुन गाडी चालक जयेश साधु भोवते वय 52 वर्ष यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने बेदरकारपणे चालवुन अशोक शामराव कोल्हारे वय 35 वर्ष रा.बुधेवाडा असे मृतकाचे नाव असुन सदर घटना दि.23 जुन 2024 रोजी रात्रि 9:00 वाजताच्या सुमारास घडली.
पाऊस सुरु असल्याने गाडी चालकाने मागुन धडक दिली
गाडी चालक हे बाक्टी येथिल मिलिंद विद्यालयात शिक्षक या पदावर आहेत तर त्यांची पत्नी ग्राम पंचायत तावसी ता.लाखांदुर जि.भंडारा येथे ग्रामसेविका पदावरती असुन दिघोरी/मोठी येथे राहतात हे दोघेही मुलीसह ढासगड येथुन परत येत असतांना अर्जुनी/मोरगाव वरुन दिघोरी कडे जात असतांना मृतक व त्याचा सोबती पतीराम शंकर देवरे वय 45 वर्ष रा.बोंडगाव/देवी हे अर्जुनी/मोरगाव कडुन पायी जात होते आणि पाऊस (rain)सुरु असल्याने गाडी चालकाने मागुन धडक दिली यात अशोक शामराव कोल्हारे याचा जागीच मृत्यु झाला सदर घटनेची पोलीस स्टेशन अर्जुनी/मोरगाव येथे नोंद करण्यात आली असुन कायनी अपराध क्रमांक 193/2024 कलम 279,304 (अ) भादंवी सहकलम 184 मो.वा.का गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी तागड आणि पोह.कोडापे करीत आहेत.