परभणी/पाथरी (Parbhani):- ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानंतर पाथरी तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आल्यानंतर खेडुळा गावांमध्ये गावाशेजारील ओढ्याचे पाणी शिरले होते. याच पाण्यामध्ये गावातील एक तरुण वाहत जात असताना गावातील काही तरुणांनी प्रसंगावधान राखत वाहणाऱ्या तरुणाचे प्राण वाचवले आहेत .
पाथरी तालुक्यातील खेडुळा येथील घटना
पाथरी तालुक्यामध्ये 1 व 2 सप्टेंबर दरम्यान 229 मिलिमीटर पावसाची झाला. अशात तालुक्यातील सर्वच नदी नाल्यांना पूर आला होता. नदी ओढ्यांचे पाणी पात्र सोडून गावातुन वाहत होते. सोमवार 2 सप्टेंबर रोजी सकाळी तालुक्यातील खेडूळा येथेही हिच परिस्थिती होती. येथे नारायण खिल्लारे नामक युवक गावात आलेल्या पुराच्या पाण्यातून चालत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. यावेळी गावातील रखमाजी डुकरे , ज्ञानेश्वर डुकरे, माणिक डुकरे ,सचिन डुकरे ,धनराज डुकरे या युवकांनी धाडस दाखवत वाहत्या पाण्यातून बाहेर काढले. या प्रसंगाचा एक व्हिडिओ (Video)सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये सदरील युवक पाण्यामध्ये बुडत असल्याचे दिसत आहे . स्थानिक .युवकांनी केलेल्या या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे .