अनिल देशमुखांनी 25 वर्षात काटोल मतदारसंघात फक्त बेरोजगारांची फौज निर्माण केली – वृषभ वानखेडे
काटोल (Aam Aadmi Party) : येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने (Aam Aadmi Party) आम आदमी पक्षाने काटोल येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
गेल्या दहा वर्षांमध्ये सरकारच्या जनता विरोधी धोरणामुळे महागाईने जनता हतबल झाली असतानाच शेतकऱ्यांच्या प्रचंड समस्या निर्माण झाल्या आहे. त्यामुळे या भागातील सर्वसामान्य जनता व शेतकरी हतबल झाले आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून काटोल मतदारसंघांमध्ये अपवाद वगळता सातत्याने मा. अनिल देशमुख (Anil Deshmukh) आमदार आहे. काही काळ वगळता या संपूर्ण कालावधीमध्ये ते महाराष्ट्राचे मंत्री सुद्धा राहिलेले आहे. परंतु आज त्यांच्याच मतदार संघामध्ये शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून सततच्या नापिकेमुळे व सरकारच्या धोरणामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदील झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या भागातील बेरोजगारी.
गेल्या 25 वर्षांमध्ये अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एकही उद्योग या मतदारसंघांमध्ये आणलेला नाही. उलट जे उद्योग आले होते किंवा येणार होते त्या उद्योगांना बंद पाडून उद्योगहीन बनवण्याचे काम अनिल देशमुख साहेबांनी केलेले आहे. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये एम.आय.डी.सी.चा विकास रखडला असून त्या एम.आय.डी.सी. मध्ये पाण्याची, विद्युतची, रस्त्याची, सुविधा नसल्यामुळे बेरोजगार तरुण त्या एम.आय.डी.सी. क्षेत्रापासून वंचित आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची फौज निर्माण झाली असून यामागे अनिल देशमुख जबाबदार आहे असे प्रतिपादन (Aam Aadmi Party) आम आदमी पार्टीचे पुढील उमेदवार वृषभ वानखेडे (Vrishab Wankhede) यांनी केले.
याप्रसंगी बोलताना वृषभ वानखेडे (Vrishab Wankhede) म्हणाले की, भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस व इतर प्रस्थापित नेते हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून सातत्याने जनतेच्या विरोधामध्ये धोरणे आखून लोकांना वेटीस धरण्याचे काम करतात. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या धन दांडग्या प्रस्थापितांना उलथावून टाकत शेतकऱ्यांचे व कष्टकऱ्यांचे राज्य निर्माण करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचा उमेदवार म्हणून मला निवडून द्यावे. असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
या (Aam Aadmi Party) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मा. नागोरावजी नखाते हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सुनिलदादा वडस्कर, अहमदभाई कादर, रमण मनकवडे, शैलेश गजबे, अजिंक्य कळंबे, संजय बोरकर, चंद्रशेखर खरपूरिया, राजु ठाकरे, अविनाश अटकळे, गुलाबरावजी राऊत, पुरुषोत्तम हगवणे, आकाश रंगारी, अमोल गौरखेडे, सुनील रेवतकर, धनराज राऊत, पुरुषोत्तम गजभिये, वसंतराव वैद्य, बहुरूपी साहेब, नरेंद्र तायडे, इत्यादी होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आम आदमी पार्टीचे सक्रिय नेते संजय उपासे, तुषार वानखेडे, दुर्गेश चौधरी, हरिश पेंदाम, निशांत गजभिये, अतुल गिरडकर, अश्विन डोंगरे, विनोद मडके, आदर्श तायवाडे, इत्यादींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज तुमडाम तर आभार प्रदर्शन निलेश पेठे यांनी केले.