हिंगोली जिल्हा नवरात्रोत्सव

जिल्ह्यात यंदा दुर्गादेवी मंडळात वाढ; ग्रामीण भागात सर्वाधिक घटस्थापना

Hingoli Navratri Festival: जिल्ह्यात नवरात्रोत्सव २०२६ निमित्त दिनांक ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटस्थापनेत शहरी आणि ग्रामीण भागात मिळून एकूण ८०४ दुर्गादेवी मंडळांची स्थापना, १० ठिकाणी शारदादेवी मंडळ..

जिल्ह्यात यंदा दुर्गादेवी मंडळात वाढ; ग्रामीण भागात सर्वाधिक घटस्थापना

Hingoli Navratri Festival

हिंगोली (Hingoli Navratri Festival) : जिल्ह्यात नवरात्रोत्सव २०२६ निमित्त दिनांक ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटस्थापनेत शहरी आणि ग्रामीण भागात मिळून एकूण ८०४ दुर्गादेवी मंडळांची स्थापना झाली असून १० ठिकाणी शारदादेवी मंडळांची स्थापना झाली आहे. यंदा जिल्ह्यात शहरी भागात १४८ परवानाधारक आणि १३ विनापरवाना अशी एकूण १६१ मंडळे बसली आहेत. तर ग्रामीण भागात ४६५ परवानाधारक आणि १७८ विनापरवाना अशी एकूण ६४३ मंडळे बसली आहेत.

एकूणच ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत चारपट जास्त मंडळांची स्थापना झाली आहे. (Hingoli Navratri Festival) हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीत ६३ परवानाधारक शहरी मंडळे आहेत. कळमनुरी हद्दीत शहरी भागात १२ परवानाधारक आणि ३ विनापरवाना अशी १५ तर ग्रामीण भागात ३० परवानाधारक आणि ५ विनापरवाना अशी ३५ मिळून एकूण ५० मंडळे आहेत. बासंबा हद्दीत ग्रामीण भागात ४४ परवानाधारक दुर्गादेवी मंडळे आणि ५ शारदादेवी मंडळे आहेत. हिंगोली ग्रामीण हद्दीत ४१ परवानाधारक आणि ८ विनापरवाना अशी ४९ मंडळे आहेत. औंढा नागनाथ हद्दीत शहरी भागात १० परवानाधारक आणि ४ विनापरवाना अशी १४ तर ग्रामीण भागात ३७ परवानाधारक आणि १६ विनापरवाना अशी ५३ मिळून एकूण ६७ मंडळे आहेत. नरसी नामदेव हद्दीत ३१ परवानाधारक आणि २ विनापरवाना अशी ३३ मंडळे ग्रामीण भागात आहेत.

सेनगांव पोलीस ठाणे हद्दीत शहरी भागात ७ परवानाधारक आणि २ विनापरवाना अशी ९ तर ग्रामीण भागात ३८ परवानाधारक आणि ५० विनापरवाना अशी ८८ मिळून एकूण ९७ दुर्गादेवी मंडळे आणि ३ शारदादेवी मंडळे आहेत, जी जिल्ह्यात सर्वाधिक आहेत. गोरेगांव हद्दीत ३६ परवानाधारक आणि १६ विनापरवाना अशी ५२ दुर्गादेवी आणि १ शारदादेवी मंडळ आहे.

वसमत शहरात ५६ परवानाधारक आणि ४ विनापरवाना अशी ६० मंडळे आहेत. वसमत ग्रामीण हद्दीत सर्व ७५ मंडळे परवानाधारक ग्रामीण भागातील आहेत. आखाडा बाळापूर हद्दीत ६५ परवानाधारक आणि २८ विनापरवाना अशी ९३ दुर्गादेवी आणि १ शारदादेवी मंडळ आहे. कुरुंदा हद्दीत ३३ परवानाधारक आणि ३२ विनापरवाना अशी ६५ मंडळे तर हट्टा हद्दीत ३५ परवानाधारक आणि २१ विनापरवाना अशी ५६ मंडळे ग्रामीण भागात बसली आहेत.

दरम्यान जिल्हाभरात शहरी भागात १४८ सार्वजनिक दुर्गा देवी मंडळाने परवाना काढला. विना परवाना १३ अशा एकुण १६१ ठिकाणी (Hingoli Navratri Festival) दुर्गादेवींची घटस्थापना करण्यात आली आहे. ग्रामीण भागात ४६५ सार्वजनिक दुर्गा देवी मंडळाने परवाना काढला. १७८ दुर्गादेवी विना परवाना मांडण्यात आल्या. ग्रामीण भागात एकुण ६४३ ठिकाणी दुर्गा देवींची घटस्थापना करण्यात आली. जिल्हाभरात एकुण ८०४ ठिकाणी दुर्गा देवींची घटस्थापना करण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

हिंगोली न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Hingoli District and Sessions Court: जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा २ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास न्यायालयाच्या इमेलवर  आला. त्यानंतर ही माहिती तात्काळ पोलिस..

Nov 02, 2026
अंबाबाई चरणी दानाचा महापूर; मंदिराला तब्बल 1 कोटींचे महसूल

अंबाबाई चरणी दानाचा महापूर; मंदिराला तब्बल 1 कोटींचे महसूल

Shri Ambabai Temple Donation: महाप्रसादातील लाडूंना भाविकांकडून मोठी मागणी असते. यंदाच्या नवरात्रोत्सवातही लाडूविक्रीने विक्रमी आकडा गाठला. अवघ्या 10 दिवसांत तब्बल 1 लाख 37 हजार 689 लाडूंची विक्री...

Oct 27, 2026
हिंगोलीतील महादेव वाडीत ५३ वर्षे पुरातन श्री तुळजाभवानी मंदिराचा भव्य जीर्णोद्धार

हिंगोलीतील महादेव वाडीत ५३ वर्षे पुरातन श्री तुळजाभवानी मंदिराचा भव्य जीर्णोद्धार

हिंगोलीच्या महादेव वाडीतील ५३ वर्षे पुरातन श्री तुळजाभवानी मंदिराचा २०२६ मध्ये भव्य जीर्णोद्धार; नवरात्रोत्सवात हजारो भाविकांनी घेतले दर्शन.

Oct 24, 2026
नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हिंगोली जिल्हा वार्षिक तपासणीस प्रारंभ

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हिंगोली जिल्हा वार्षिक तपासणीस प्रारंभ

Hingoli District Annual Inspection: नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हिंगोली जिल्ह्याच्या वार्षिक तपासणीस  २१ ऑक्टोबर २०२६ पासून प्रारंभ झाला आहे.

Oct 21, 2026
हिंगोली जिल्ह्यात चारा टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाच्या विविध उपाययोजना

हिंगोली जिल्ह्यात चारा टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाच्या विविध उपाययोजना

Hingoli Fodder Shortage: जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

Oct 19, 2026