हिंगोली (Goddess Durga Immersion) : जिल्ह्यात ८०४ ठिकाणी दुर्गा देवींची घटस्थापना करण्यात आली आहे. नवरात्र महोत्सवात अनेक धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. २१ ऑक्टोंबरला जिल्ह्यात सर्वाधिक ४६४ दुर्गादेवींचे विसर्जन करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ८ व्या दिवसापासून म्हणजेच १८ ऑक्टोबर पासून विसर्जनाला सुरुवात होत असली तरी १८ ऑक्टोबर आणि १९ ऑक्टोबर रोजी एकाही मंडळाचे विसर्जन नाही.
पोलीस ठाणे निहाय विसर्जनाचा तपशील पुढील प्रमाणे:
हिंगोली शहर: येथे एकूण ६३ मंडळे आहेत. यापैकी १० व्या दिवशी २० ऑक्टोबर रोजी १, ११ व्या दिवशी २१ ऑक्टोबर रोजी ३१, १२ व्या दिवशी २२ ऑक्टोबर रोजी १९, १३ व्या दिवशी २३ ऑक्टोबर रोजी ९, १४ व्या दिवशी २४ ऑक्टोबर रोजी २ आणि १५ व्या दिवशी २५ ऑक्टोबर रोजी १ मंडळाचे विसर्जन होईल.
कळमनुरी: येथे एकूण ५० मंडळे आहेत. यापैकी २१ ऑक्टोबर रोजी ३५ आणि २४ ऑक्टोबर रोजी १५ मंडळांचे विसर्जन होईल.
बासंबा: येथील सर्व ४४ मंडळांचे विसर्जन २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
हिंगोली ग्रामीण: येथील सर्व ४९ मंडळांचे विसर्जन २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
औंढा नागनाथ: येथे एकूण ६७ मंडळे आहेत. यापैकी २० ऑक्टोबर रोजी ५२ आणि २१ ऑक्टोबर रोजी १५ मंडळांचे विसर्जन होईल.
सेनगाव: जिल्ह्यात सर्वाधिक ९७ मंडळे सेनगाव ठाणे हद्दीत आहेत. यात २० ऑक्टोबर रोजी १०, २१ ऑक्टोबर रोजी ४०, २२ ऑक्टोबर रोजी ४२ आणि २३ ऑक्टोबर रोजी ५ मंडळांचे विसर्जन होईल.
गोरेगाव: येथे एकूण ५२ मंडळे आहेत. यापैकी २० ऑक्टोबर रोजी ८ आणि २१ ऑक्टोबर रोजी ४४ मंडळांचे विसर्जन होईल.
नर्सी नामदेव: येथे एकूण ३३ मंडळे आहेत. यापैकी २० ऑक्टोबर रोजी १, २१ ऑक्टोबर रोजी १६, २२ ऑक्टोबर रोजी ६ आणि २४ ऑक्टोबर रोजी १० मंडळांचे विसर्जन होईल.
वसमत शहर: येथे एकूण ६० मंडळे आहेत. यापैकी २० ऑक्टोबर रोजी २५, २१ ऑक्टोबर रोजी १६, २२ ऑक्टोबर रोजी १५ आणि २४ ऑक्टोबर रोजी ४ मंडळांचे विसर्जन होईल.
वसमत ग्रामीण: येथे एकूण ७५ मंडळे आहेत. यापैकी २० ऑक्टोबर रोजी ५५ आणि २१ ऑक्टोबर रोजी २० मंडळांचे विसर्जन होईल.
आ. बाळापूर: येथे एकूण ९३ मंडळे आहेत. यापैकी २० ऑक्टोबर रोजी १, २१ ऑक्टोबर रोजी ८९, २२ ऑक्टोबर रोजी २ आणि २३ ऑक्टोबर रोजी १ मंडळाचे विसर्जन होईल.
कुरुंदा: येथे एकूण ६५ मंडळे आहेत. यापैकी २० ऑक्टोबर रोजी २० आणि २१ ऑक्टोबर रोजी ४५ मंडळांचे विसर्जन होईल.
हट्टा: येथे एकूण ५६ मंडळे आहेत. यापैकी २० ऑक्टोबर रोजी २६, २१ ऑक्टोबर रोजी २० आणि २२ ऑक्टोबर रोजी १० मंडळांचे विसर्जन होईल.
जिल्ह्याचा एकत्रित विचार केल्यास २० ऑक्टोबर रोजी १९९, २१ ऑक्टोबर रोजी सर्वाधिक ४६४, २२ ऑक्टोबर रोजी ९४, २३ ऑक्टोबर रोजी १५, २४ ऑक्टोबर रोजी ३१ आणि २५ ऑक्टोबर रोजी १ अशा एकूण ८०४ दुर्गादेवींचे विसर्जन ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. दरम्यान, शारदादेवी विसर्जनाची (Goddess Durga Immersion) माहिती देखील पोलिसांनी दिली असून जिल्ह्यात एकूण १० शारदादेवी मंडळे आहेत. या सर्व १० मंडळांचे विसर्जन २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यामध्ये बासंबा येथील ५, सेनगाव येथील ३, गोरेगाव येथील १ आणि आ. बाळापूर येथील १ मंडळाचा समावेश आहे.