जागतिक रासायनिक उद्योग केंद्र

भारताला जागतिक रासायनिक उद्योगाचे केंद्र बनवण्यावर भर; महाराष्ट्रात नवे धोरण लवकरच

India Global Chemical Industry Hub: जागतिक रासायनिक उद्योगात भारताचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन...

भारताला जागतिक रासायनिक उद्योगाचे केंद्र बनवण्यावर भर; महाराष्ट्रात नवे धोरण लवकरच

India Global Chemical Industry Hub

 

2040 पर्यंत एक ट्रिलियन डॉलरच्या उद्योगाचे उद्दिष्ट

मुंबई (India Global Chemical Industry Hub) : जागतिक रासायनिक उद्योगात भारताचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित ‘इंडिया केम 2026’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांचा संदेश सादर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी पंतप्रधानांचा संदेश वाचून दाखवला.

‘ॲडव्हान्टेज्ड भारत: ॲन इमर्जिंग ग्लोबल केमिकल हब’ या संकल्पनेवर आधारित या (India Global Chemical Industry Hub) प्रदर्शनात रासायनिक क्षेत्रातील उद्योजक, संशोधक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते सहभागी झाले आहेत. कृषी, औषधनिर्मिती, वस्त्रोद्योग आणि वाहन उद्योगासाठी रसायनांचे महत्त्व लक्षात घेता, या क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात आला. तसेच स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि सेमीकंडक्टर उद्योगांना आवश्यक असलेल्या प्रगत रासायनिक उत्पादनांच्या निर्मितीसाठी गुंतवणूक वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.

2040 पर्यंत उद्योगाचा एक ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य

भारताचा रासायनिक उद्योग (India Global Chemical Industry Hub) सध्या सुमारे 220 अब्ज डॉलरचा असून, 2040 पर्यंत त्याचा विस्तार एक ट्रिलियन डॉलरपर्यंत करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. 2047 पर्यंत हा उद्योग 1.6 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे दीर्घकालीन लक्ष्य असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी दिली.

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन, औद्योगिक पायाभूत सुविधांचा विकास, रासायनिक पदार्थांची सुरक्षित हाताळणी आणि प्लास्टिकच्या पुनर्वापराला चालना देण्यावर सरकारचा भर आहे. रासायनिक उद्योगासाठी आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या रसायन उद्यानांच्या विकासासाठीही केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक उद्यानासाठी एक हजार कोटी रुपयांपर्यंत केंद्रीय आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आहे.

पालघरमध्ये रासायनिक उद्योगाचे मोठे केंद्र उभारणार

महाराष्ट्रात रासायनिक उद्योगाच्या वाढीसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते जाहीर करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर परिसरात मोठे रासायनिक उद्योग केंद्र विकसित करण्याची राज्य सरकारची योजना आहे. यामुळे उद्योगांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यास आणि नव्या गुंतवणुकीला चालना मिळण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

राज्यात सध्या सुमारे 3,600 रासायनिक उद्योग कार्यरत असून, (India Global Chemical Industry Hub) देशाच्या रासायनिक उद्योगातील स्थूल मूल्यवर्धनात महाराष्ट्राचा वाटा जवळपास 19 टक्के आहे. या क्षेत्रातील राज्याचे योगदान अधिक वाढविण्यासाठी उद्योगांना आवश्यक सुविधा पुरविणे, गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आणि औषधनिर्मितीसाठी लागणाऱ्या सक्रिय औषधघटकांचे (API) देशांतर्गत उत्पादन वाढविणे यावर नव्या धोरणात लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

भारताला जागतिक रासायनिक उत्पादन क्षेत्रात आघाडीवर नेण्याच्या प्रयत्नांना महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाची जोड मिळाल्यास रोजगारनिर्मिती, तंत्रज्ञान विकास आणि निर्यातवाढीसाठी नव्या संधी निर्माण होऊ शकतात.